पुणे ता 15. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने ४५ वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा २०२३ नेताजी सुभाष विद्यालय मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये १६ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये पुणे विभाग मुलींच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळविले.
या संघामध्ये इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर विद्यालयाच्या ७ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यालयातील समृद्धी चांदगुडे ,श्रावणी चांदगुडे, साक्षी साळुंके ,तन्वी साळुंके, प्रणाली पवार, वर्षा काळे ,स्नेहा जगताप या मुलींचा सहभाग होता.पुणे विभाग टीमला मार्गदर्शन किरण पवार यांचे लाभले.
संस्थेचे अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे , कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग, विरबाला पाटील,राही रणसिंग, प्रा लक्ष्मण मेटकरी ,महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन सदस्य प्रा निलेश जगताप, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले ,पुणे विभागीय सचिव विलास घोगरे ,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील ,विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग, विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण पानसरे ,बागल व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू मुलींचे व मार्गदर्शक किरण पवार अभिनंदन केले.
म्हसोबाचीवाडी ग्रामस्थांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक यांचे हलगीच्या निनादात स्वागत करून सन्मानित केले. यावेळी सरपंच राजेंद्र राऊत ,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पवार, माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश कवडे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.