पुणे ता. 16 : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 1 हजार. 112 ग्रामपंचायतींना 35 कोटी 18 लाख 73 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती या आर्थिक दृष्ट्या मालामाल होणार आहेत.
राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सन 2023 -24 या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्या अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. या निधीची जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी याकरिता सनियंत्रण व समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत. येत्या पाच दिवसात हा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावरती जमा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवरती सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेल्या या निधीची माहिती ग्रामविकास विभागाच्या उप सचिवांनी जिल्हा परिषदेला 13 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयाच्या आधारे कळविली आहे. व या शासन निर्णयाच्या आधारे ग्रामपंचायतींना निधी वितरित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील तालुका निहाय कंसात ग्रामपंचायती संख्या व प्रत्येक तालुक्याला उपलब्ध झालेला निधी पुढीलप्रमाणे -आंबेगाव (78)- 1 कोटी 98 लाख 57 हजार , बारामती (81)-2 कोटी 82 लाख 30 हजार , भोर (136)- 1 कोटी 76 लाख 37 हजार , दौंड (79)- 3 कोटी 79 लाख 22 हजार, हवेली (67) 2 कोटी 89 लाख 70 हजार , इंदापूर (115)- 4 कोटी 34 लाख 7 हजार, जुन्नर (119)- 3 कोटी 31 लाख 73 हजार, खेड (147 )- 3 कोटी 76 लाख 60 हजार ,मावळ ( 82)- 2 कोटी 53 लाख 61 हजार, मुळशी (70)- 1 कोटी 49 लाख 81 हजार, पुरंदर (78)- 1 कोटी 86 लाख 58 हजार, शिरूर (95) 4 कोटी 3 लाख 80 हजार, वेल्हे (65 ) – 56 लाख 37 हजार