इंदापूर ता. 22 : नुकत्याच संपलेल्या नागपूर अधिवेशनात आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील विकास कामांसाठी निधी तर आणलाच परंतु त्याचबरोबर तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळात मांडले. त्यामुळेच तर तालुक्यातील जनता म्हणत आहे ‘दत्तात्रय भरणे कामाचा आमदार नागपूर अधिवेशनातील कामगिरी दमदार’
आमदार श्री भरणे यांनी अधिवेशनात शंभर टक्के उपस्थितीत लावली. त्याच बरोबरच पुरवणी बजेट मध्ये इंदापूर तालुक्यातील 11 रस्ते व 4 पूल बांधकाम तसेच इंदापूरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशहवली बाबा दरगाह च्या सुशोभीकरण साठी सुमारे 108 कोटींचा निधी मंजुर करून आणला.
12 डिसेंबरला वालचंदनगर येथे 630 कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. कामगारांच्या हितासाठी तत्काळ कंपनी प्रशासन कामगार मंत्री व पालकमंत्री यांची बैठक कामगारां समवेत बैठक घ्यावी. व कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी श्री भरणे यांनी यावेळी विधिमंडळात केली. यावर लवकरच बैठक घेतली जाईल. असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कामगारांमध्ये त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्याच कामगारांनी परत लगेच 17, डिसेंबरला श्री भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी जाऊन विधिमंडळात प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी 13 डिसेंबरला विधिमंडळात शेती महामंडळातील कामगारांच्या घरकुला, घरकुलासाठी जागा. सहाव्या वेतन आयोगा नुसार पगार मागील वेतन आयोगातील फरक व रिक्त जागा भरणे संदर्भातील मागणी अशा संदर्भातील मुद्दे नमूद करत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. महसूल मंत्र्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या सर्व मागण्या योग्य असल्याचे नमूद करत शेती महामंडळातील कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मनातून मात्र श्री भरणे यांनी विधिमंडळात आपल्या एकाच प्रश्नातून शेती महामंडळातील कामगारांचे पाच प्रश्न मार्गी लावल्याने तालुक्यातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिलेला शब्द पाळणारा नेता अशी श्री भरणे यांची राज्यभर ओळख आहे. म्हणूनच इंदापूर व पुणे जिल्ह्यात राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेने श्री भरणे यांची यासंदर्भात भेट घेऊन आमच्या समस्या मांडण्याची विनंती केली होती. यावर श्री भरणे यांनी आपण विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करून आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचलो अशी ग्वाही दिली होती. यावर आज 19 डिसेंबर रोजी श्री भरणे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यांच्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे. असे सांगत यात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे हक्काच्या वेतनासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच वेतन व महागाई भत्तेही द्यावेत इतर शासकीय सोयी सुविधा द्याव्यात. या संदर्भात मुद्दा उपस्थित करून तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिला..
श्री भरणे यांनी सर्वांना न्याय मिळेल असे प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडल्याने व निधी आणल्याने तालुक्यातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.