• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ! कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती

हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी यशस्वी  !  कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती

इंदापूर : दि. 3 :  मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचा 17-18 महिन्यांपासून संपलेला वेतनवाढीचा करार येत्या दोन महिन्यात करणे तसेच सर्व थकीत पगार अदा करणे आदी निर्णय मुंबईत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या समवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गेली 42 चालू असलेला संप मिटला असून, कर्मचारी गुरुवार दि. 4 पासून कामावर रुजू होतील, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.2) दिली.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगार दि. 22 नोव्हेंबर पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर होते. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांमगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत मंत्रालयात सर्व संबंधितांच्या बैठकीचे आज मंगळवारी (दि.2) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मालक चिराग दोषी, वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी आदींनी चर्चेमध्ये भाग घेतला. या बैठकीमध्ये सर्वमान्य तोडगा करण्यात आला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

वेतन वाढीचा करार कामगार मंत्र्यांच्या सहीने होणार असून करार संपला त्यावेळी पासून चा फरक लागू होईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराची 40 टक्के रक्कम येत्या सात दिवसात व त्यानंतर दोन महिन्यात 30 : 30 टक्के या प्रमाणे थकीत पगाराची सर्व रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यावर आकसाने शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसून, उत्पादन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे बैठकीत ठरल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचेशी दि.10 डिसें. रोजी दूरध्वनीवरुन चर्चा करून वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या संपासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती केली होती. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण हर्षवर्धन पाटील यांना शासनाच्या वतीने देण्यात आले होते. या बैठकीतून कामगारांच्या मागण्यांवरती सर्वमान्य तोडगा निघाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
•चौकट:-
कामगार मंत्री वालचंदनगरला येणार – हर्षवर्धन पाटील
———————————————
या बैठकीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वालचंदनगरला भेट देण्याचे निमंत्रण हर्षवर्धन पाटील यांनी दिले. सदरचे निमंत्रणाचा स्वीकार करीत लवकरच वालचंदनगरला भेट देण्यासाठी येणार असल्याचे यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
__________________________

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात सावित्रीबाईं फुले यांना  अभिवादन*

*पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात सावित्रीबाईं फुले यांना अभिवादन*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group