शेटफळगढे ता. 13 : स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान आहे तसेच राष्ट्रमाता जिजाऊ घराघरात निर्माण व्हायला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य जितेंद्र गावडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज शेटफळगढे विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे, सविता खराटे, गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर, डॉ काशिनाथ सोलनकर उपस्थित होते.
जितेंद्र गावडे पुढे म्हणाले की,स्वामी विवेकानंद यांनी भारताचे नाव जगात अजरामर केले, सर्व धर्म समभाव त्यांनी रुजवला तर राष्ट्रमाता जिजाऊंचा जीवनपट त्यांनी आपल्या भाषणातून उलगडला.
यावेळी श्रावणी निगडे,नम्रता बालगुडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केली. तात्यासाहेब गाडेकर, डॉ काशिनाथ सोलनकर,किरण कोकणी, नामदेव दराडे यांनी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व बक्षिसे दिली.कु ईश्वरी कन्हेरकर, धनश्री धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन अर्चना नाझीरकर व सर्व शिक्षक सेवक वृंद यांनी केले.
————————————–