शेटफळगढे, ता 14 चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करा व इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी गेले ५५ दिवसापासून पाठपुरावा करणारे भगवान खारतोडे यांनी मागील पाच दिवसापासून आपल्या दोन बैलांसह उपोषणास सुरुवात केली आहे.
निरगुडे ता इंदापूर येथील तलाठी कार्यालयासमोर दोन बैलांसह उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे गेले ५५ दिवसात दोन वेळा खारतोडे यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता तसेच दोन वेळा उपोषणही मागण्या मान्य करण्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. मात्र चार जानेवारीला खारतोडे यांना तहसीलदार यांनी लेखी पत्र देऊन संबंधित मागणीसाठी कृषी विभाग, महावितरण विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडे आदेशाद्वारे सूचित करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचे भगवान खारतोडे यांनी सांगितले.
भगवान खारतोडे यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत इंदापूर तालुक्यामधील उजनीचा भाग व नद्यांचा भाग वगळून मध्यम बाकीचे भागातील गावात अतितीव्र गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर करावा
बाजरी कांदा सोयाबीनचा पिकविमा शेतकन्यांच्या खात्यामध्ये जमा करणेत यावा दुष्काळामुळे चारा छावणी व चारा डेपो सुरू करावेत.विजबील माफ करण्यात यावे.चालू व मागील थकीत संपुर्ण कजमाफी करून उतारा कोरा करणेत यापा शेततळे खोदाई अनुदानामध्ये वाढ तसेच अस्तरीकरण करणेच्या अनुदानात करणेत यावी.
कोरोना काळात रेशन चे अन्न धान्य दोन शिधापत्रिकांचे वाटप केले, तसेच दुष्काळ परीस्थिती झाल्याने दोन शिधाप्रत्रिकांचे वाटप करण्यात यावे
पर्जन्यमापक यंत्र मौजे निरगुडे येथे बसविण्यात यावे. मौजे निरगुडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एक दिवस केंद्रतील डॉक्टर यांनी भेट दयावी.
चौकट
या उपोषणाच्या वेळी इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तालुक्यातील संबंधित विभागांची एकत्रित बैठक लावून या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तरीही खारतोडे यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला मात्र ग्रामस्थांनी तहसीलदार यांना लवकरात लवकर बैठक लावण्याची विनंती केली त्यावर तात्काळ बैठक लावण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार ठोंबरे यांनी दिले यावेळी गाव कामगार तलाठी श्रीमंत दराडे उपसरपंच हनुमंत काजळे यशवंत केकान विजय काळे युवराज भोसले किसन काजळे गोविंद गोसावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
———————————————-