नारायणगाव ता.१५ – असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ अन-एडेड इंजिनिअरींग काॅलेजे्स (महा), असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ पाॅलिटेक्निक्स (महा) व असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ अँग्रीकल्चर अँण्ड अँग्रीकल्चर अलाईड काॅलेजेस् (महा) या राज्यस्तरीय नोंदणीकृत तिन्ही असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अथर्व चेंबर्स, चौथा मजला, शिवाजीनगर, पुणे येथील सभागृहाचे उद्घाटन, नामकरण व पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०४ वाजता संपन्न होणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री. बाळासाहेब थोरात साो., (माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन) हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. राजेशजी टोपे साो., (माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन), मा.श्री. सुभाष देशमूख साो., (माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र शासन), मा.श्री. सतेज (बंटी) पाटील साो. (माजी गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन), मा. श्री. शेखर निकम साो., (आमदार, चिपळूण मतदार संघ), मा. श्री. शेखर गायकवाड साो., (सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय विनाअनुदानित अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये या तिन्ही राज्यस्तरीय असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब(भाऊ) देवराम वाघ यांनी ‘असोसिएशन’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आणि अथक प्रयत्नाने ती साकारली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने बहरवली सुद्धा, त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचा गुणात्मक दर्जा उंचाविण्यासाठी सकारात्मक मदत झाली. असोसिएशनच्या पुणे येथील नुतन सभागृहाचे उद्धाटन, नामकरण व पुरस्कार वितरण समारंभ दिनांक १६ फेबु्वारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांनी केलेल्या अतुलनीय, भरीव योगदानाबद्दल व त्यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे नामकरण ‘मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ सभागृह” असे करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सभागृहाचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ, मा. डॉ. आर. पी. जोशी व मा. प्रा. पी.एन. कुलकर्णी यांच्या नावे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार बहाल केले जाणार आहेत.
मा कै.बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांचे नावे इंजिनिअरींग असोसिएशन तर्फे पुणे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. डॉ. प्रमोद पांडुरंग विटकर व पाॅलिटेक्निक्स असोसिएशन तर्फे कोपरगाव येथील संजीवनी रुरल एज्युकेशनचे अध्यक्ष मा. नितीन शंकरराव कोल्हे व अँग्रीकल्चर अँण्ड अँग्रीकल्चर अलाईड असोसिएशन तर्फे नारायण गाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे एबीएम काॅलेज ऑफ अँग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे मा. अनिल जी. मेहेर यांना ‘मा .बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
इंजिनिअरींग असोसिएशन तर्फे सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून जे.एस.पी.एमचे राजश्री शाहु काॅलेज ऑफ इंजिनिअरींग यांना ‘मा .बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरियल बेस्ट इन्स्टिट्युट अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व पॉलिटेक्निक असोसिएशन तर्फे सर्वोत्तम पॉलिटेक्निक म्हणून कोपरगाव येथील संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकला गौरविण्यात येणार आहे.
इंजिनीअरिंग असोसिएशन तर्फे इस्लामपुर येथील राजाराम बापु इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. सुषमा एस. कुलकर्णी यांना प्राचार्य डॉ. आर. पी. जोशी यांचे नावे ‘प्राचार्य डॉ. आर. पी. जोशी मेमोरियल अवार्ड फोर बेस्ट प्रिन्सिपल’ प्रदान करण्यात येणार आहे. इंजिनीअरिंग असोसिएशन तर्फे सोलापुर येथील वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॅजीचे डाॅ.प्रतिभा कालदिप यांना ‘डॉ. पी. एन. कुलकर्णी मेमोरियल अवार्ड फोर बेस्ट टीचर’ने गौरविण्यात येणार आहे. तसेच पॉलिटेक्निक्स असोसिएशन तर्फे नाशिक येथील के के वाघ पॉलिटेक्निक चे ‘डॉ. प्रविण भंडारी यांना ‘ ‘मा .बाळासाहेब (भाऊ) देवराम मेमोरियल अवार्ड फोर बेस्ट टीचर’ने गौरविण्यात येणार आहे.
आजमितीस महाराष्ट्रातील २५० अभियांत्रिकी, २०० तंत्रनिकेतन आणि १०१ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये या नोंदणीकृत असोसिएशनचे सभासद आहेत. आदरणीय बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांनी या तिन्ही असोसिएशनच्या स्थापनेपासुन २०२२ साला पर्यंत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. तिन्ही असोसिएशनच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्सास सभासद महाविद्यालयांची मोलाची साथ मिळाली. त्यांच्या पश्च्यात सध्या तिन्ही असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मा. समीर बाळासाहेब वाघ हे कार्यरत आहेत.
कार्यक्रमास तिन्ही असोसिएशनचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ व पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केलेले आहे.