भिगवण ता.6 : अखिल भारतीय मराठा महासंघ इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून छगन वाळके यांची तर भिगवण शाखाध्यक्ष म्हणून डॉ. संकेत मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयात मराठा महासंघ पुणे विभागीय संघटक श्री राजकुमार मस्कार सर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष सभेमध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात येत असल्याचे भिगवण शाखेचे खजिनदार अशोक साळुंके यांनी जाहीर केले. तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष राजकुमार मस्कर सर यांची अ. भा. मराठा महासंघाचे पुणे विभागीय संघटक म्हणून निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर पूर्वी शाखा अध्यक्ष म्हणुन काम करीत असलेले वाळके यांना तालुका अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली व य भिगवण शाखाध्यक्ष पद रिक्त झाल्यामुळे आज पर्यंत शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणारे डॉ संकेत मोरे यांची शाखाध्यक्ष म्हणून वर्णी लागली. याच वेळी तक्रारवाडी येथील युवा कार्यकर्ते किरण पन्हाळे यांची अ. भा. मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा युवक संघटक म्हणून निवड करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी सांगितले. सदर सर्व निवडीचे अधिकृत पत्र ॲड जगताप यांनी संबंधितांकडे सुपूर्त केले.
सर्व समाज बांधवांचे सौख्य साधून तालुक्यातील मराठा महासंघाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्या संदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मनोगत वाळके आणि मोरे यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केले. सदर वेळी राजकुमार मस्कर. ॲड पांडूरंग जगताप, जयप्रकाश खरड, अशोक साळुंके, भरत मोरे, सुभाष फलफले, बाळासाहेब गोडसे, राजेंद्र वाघ, सुनिल काळे,प्रशांत गायकवाड,प्रशांत ढवळे, संजय ननवरे,अभिनव वाघ,बापू जानभरे,संतोष रकटे, प्रवीण गिरमकर तसेच भिगवण व पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..