शेटफळगढे ता 9 : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त अजित पवार यांच्यामध्येच असल्याने शेतकऱ्यांनी अजित पवाराच्या विचाराला साथ देणे गरजेचे आहे त्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आपल्या गावातून भरघोस मताधिक्य द्या. असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
शेटफळगढे (ता इंदापूर) येथील घोंगडी बैठकीदरम्यान केले इंदापूर तालुक्यात महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ गावोगावी आमदार भरणे घोंगडी बैठकांच्या आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान बोलताना भरणे यांनी सांगितले की पुणे शहर दिवसेंदिवस वाढत असल्याने खडकवासल्यावर अवलंबून असलेल्या शेतीचा प्रश्न गंभीर बनत आहे त्यामुळे आपल्या तालुक्याच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित दादा नेहमी काम करीत आहेत.
पुण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय आपली शेती चालणार नाही त्यामुळे पुण्याच्या पाण्याची परिव्यवस्था करण्याचे काम केवळ महायुतीचे सरकारच करू शकते त्यामुळे आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवारांच्या विचाराचा उमेदवार निवडून द्यावा. केवळ भावना अथवा भावनिक मुद्द्यावर आपला प्रपंच चालत नाही. त्यामुळे आपल्या शेतीवाडीचा व विकासाचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहावे.त्यांना मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहनही भरणे यांनी यावेळी केले.
यावेळी बाळासाहेब कोळेकर व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनीही मार्गदर्शन केले देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार आहे त्यामुळे विकासाला साथ देण्यासाठी माहितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुका अध्यक्षा साधना केकाण डी एन जगताप, हनुमंत बंडगर, तुकाराम बंडगर, भाऊसाहेब सपकळ ,शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, माऊली भोसले ,सागर वाबळे, सरपंच राहुल वाबळे, उपसरपंच सोमनाथ सवाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.