डॉ. संदेश शहा. पत्रकार इंदापूर
इंदापूर ता.14 : येथील शहा ग्लोबल स्कूल मध्ये आमच्यावर विश्वास ठेवून पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला. या विश्वासाला शहा परिवार कोठेही तडा जावू देणार नाही. इंदापूर तालुक्यात
एकेकाळी शिक्षणाची सुविधा नसताना, सन १९३८ साली आमच्या आजोबांनी शाळा व नंतर कॉलेजची स्थापना केली. तोच वारसा जपत, आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून त्यांचे पणतु अंगद शहा यांनी ग्लोबल स्कुलची सुरवात केली, हा योगायोग आहे, असे मत इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहर माळवाडी रोड लगत शहा ग्लोबल स्कुल चे उद्घाटन श्रीमती मालती सुरेशदास शहा यांच्या हस्ते फित कापून दिनांक १३ जून रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त मुकुंद शहा, इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचे संस्थापक डॉ. संजय शहा, स्कुलचे व्यवस्थापक अंगद शहा उपस्थित होते. इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष वसंतराव मालुंजकर, संजय दोशी, नरेंद्र गांधी, वैशाली शहा, रुचिरा अंगद शहा, मुकुंद शहा, नितीन शहा, डॉ. राम अरणकर, अरविंद गारटकर, बाळासाहेब पाटील, राजेंद्र जगताप, गणेश महाजन, सुरेश जकाते, स्वप्नील राऊत, आरशद सय्यद, शहरा तील प्रतिष्ठित मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरत शहा पुढे म्हणाले, या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारीक ज्ञान देण्यावर आमचा भर आहे. शाळेतील शिक्षण दर्जेदार असेलच, त्याच बरोबर येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा पाया देखील मजबूत करणार आहोत. पालकांच्या चांगल्या सूचनांचे शाळा स्वागत करेल. येणारी पिढी सुसंस्कृत घडेल अशी ग्वाही शेवटी भरत शहा यांनी दिली.
यावेळी शाळेचे विश्वस्त मुकुंदशेठ शहा म्हणाले, आजची युवापिढी ही उद्या देशाचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे युवापिढीस पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक व समाज वाचनाचे ज्ञान देवून त्यास शहा ग्लोबल स्कूल चे ब्रँड म्हणून विकसित केले जाईल. आपला पाल्य या शाळेत शिकत आहे याचा सार्थ अभिमान पालकांना राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच आयुष्य जगण्याची कला शिकवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थांला एक आदर्श व्यक्ती म्हणून घडविण्यासाठी शहा परिवाराने सुरू केलेल्या या शहा ग्लोबल स्कुल मधून देशाचे भविष्य घडेल, असा मला सार्थ विश्वास आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचे संस्थापक डॉ. संजय शहा म्हणाले, मन, मेंदू व मनगट बळकट करण्याचे शिक्षण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार असून त्यासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी आनंद घेता यावा यासाठी सेल्फी पॉईंट, खेळणी व सर्व वर्ग खुले करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंगद शहा म्हणाले, शहा परिवाराच्या तीन पिढ्यांनी सचोटीने व्यापार करण्याबरोबरच शिक्षणासह विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून समाजसेवेस प्राधान्य दिले आहे. त्यांच्या संस्काराचा वारसा जोपासत आता चौथी पिढी देखील हा वारसा संवर्धित करण्यासाठी कटिबध्द आहे.
सूत्रसंचालन समन्वयक ऋतुजा महाजन यांनी केले. पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत स्कुलच्या शिक्षिका रिटा शुक्ला, कल्याणी यादव, संध्या यादव, श्रुतिका खटावकर यांनी केले.
फोटो ओळ : इंदापूर येथे शहा ग्लोबल स्कुलचे लोकार्पण करताना श्रीमती मालती शहा व मान्यवर.