भिगवण ता. 24 : इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ व्यंकटेश लॉन्स भिगवण येथे उत्साही वातावरणात पार पडला.
गुणगौरव समारंभाला माननीय श्री. आमदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ चे आमदार यशवंततात्या माने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणीजनांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संस्थेचा कारभार हा योग्य दिशेने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, मोबाईल बँकिंग ॲपच्या माध्यमातून संस्थेचा कारभार ऑनलाईन केल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले. पुढील काळात संस्था आर्थिक सक्षम बनवा आणि पारदर्शी कारभार करून सभासदांची हित करणारे निर्णय घ्या असा वडीलकीचा सल्ला दिला.
101 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे यावर्षी देण्यात आलेला सर्वात उच्चंकी म्हणजेच 11.11 टक्के लाभांश व सभासद बंधू-भगिनींची व शिक्षकांची उपस्थिती. मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांनी संचालक मंडळ कोणतेही मानधन न घेता किंवा कोणत्याही आर्थिक लाभ न घेता करत असलेल्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. सोसायटीचा कारभार करत असताना सभासद हित समोर ठेवून नेहमीच निर्णय घ्यावेत अशा सूचना ही दिल्या. एकंदरीत सर्व कारभाराबद्दल मनापासून सर्वांचे अभिनंदन केले. दहा टक्के व्याजदर पिडीसीसी बँकेकडून कर्ज घेऊन, सभासदांना नऊ टक्के व्याजदराने कर्ज वाटप केले व उच्चांक 11.11% ने लाभांश वाटप केला हे गणित फक्त शिक्षक पतसंस्थेतील संचालक मंडळाला जमू शकते असे गौरवोद्गार काढले. पतसंस्थेचे आर्थिक स्थिती तिच्या लाभांश वाटपातच दिसून येते असे स्पष्ट करत संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेचा लेखाजोखा मांडताना सन्माननीय चेअरमन श्री.सतीश विठ्ठल दराडे यांनी सन 2023- 24 या आर्थिक वर्षामध्ये सर्व संचालक मंडळांनी केलेल्या पारदर्शक कारभार संस्थेच्या इतिहासातील सर्वात उच्चंकी लाभांश देण्यात आला आहे. संचालक मंडळ व उपस्थिती भत्ता 0 रुपये, वर्षभरातील वार्षिक सर्वसाधारण सभा वगळता सत्कार खर्च 0 रुपये, सचिव व सहसचिव मानधन खर्च शून्य रुपये, वर्षभरातील संचालक व सभासद चहापान खर्च 0 रुपये व गेली अकरा वर्ष असणार थकित गाळे डिपॉझिट यावर्षी 100% वसूल करण्यात आले वेळोवेळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय दत्तामामा भरणे यांचेही संस्थेला मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सभापतींनी आपल्या भाषणात नमूद केले. येणाऱ्या कालावधीमध्ये संस्थेच्या कारभारात कोणत्याही प्रकारच राजकारण न आणता पारदर्शक व सभासद हितासाठी निर्णय घेतले जातील असेही स्पष्ट केले. तसेच पतसंस्थेच्या या मोबाईल बँकिंग ॲपमुळे दैनंदिन व्यवहार तसेच आणि पतसंस्थेमध्ये आपल्या खात्याचा तपशील आणि व्यवहार प्रत्येकाला वैयक्तिकरित्या पाहता व सीबीएस प्रणाली द्वारे करता येते येणार आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमाणेच हे अँप आपणासाठी उपलब्ध करून दिल्याचे व सेविंग खात्या वरील रकमेला मासिक द.सा.द.शे. 6% व्याज देण्याचे व मोठे कर्ज मर्यादा 32 लाख रुपये केल्याचे यावेळी अध्यक्ष सतीश दराडे यांनी सांगितले.
यानंतर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांना सुरुवात झाली व सर्वांच्या उपस्थितीत सर्व विषय साधक बाधक चर्चा होऊन सभासदांचे प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन व उपविधी बहुमताने मंजूर करून सभा संपन्न झाली.
उपस्थिती भत्ता म्हणून उपस्थित असणाऱ्या सभासदांसाठी प्रति सभासद 1100 रुपये वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वाभिमानी परिवाराचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे, शिवाजीराव संघटनेचे अध्यक्ष अनिल आप्पा रुपनवर, शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव बागल,इबटा संघटनेचे अध्यक्ष मंगेश शेंडे , कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भरतीचे अध्यक्ष सतीश शिंदे, जुन्या पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सचिन दराडे तसेच सर्व संचालक , ज्येष्ठ मार्गदर्शक व सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सचिन देवडे यांनी केले तर शेवटी आभार उपसभापती संतोष गदादे यांनी मानले.