भिगवण ता. 24 : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या काल भिगवण येथे झालेल्या सभेत सत्ताधारी संचालक मंडळाचा बेकायदेशीर व लुटीचा कारभार विरोधकांनी समोर आणुन सत्ताधा-यांना धारेवर धरले. यावेळी सभेत प्रचंड गोधळ झाला.सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे न देताच संचालक मंडळ स्टेज सोडून निघुन गेले . अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.
सध्याचे संचालक मंडळ खोटे आरोप करुन ,खोटी आश्वासने देऊन,पुढाऱ्यांचा वापर करुन सत्तेत आले असुन संचालक मंडळाने ठेवीचे व्याजदर कमी करुन सभासदांचे केलेले ६० लाख रुपयांचे नुकसान,चुकीच्या पद्धतीने १ कोटी ६ लाख येणे व्याज दाखवुन व गंगाजळीची लुट करुन दिलेला लाभांश,अहवालामध्ये असणाऱ्या प्रचंड चुका,संस्थेचे थकलेले ३ कोटी रुपये कर्ज,संस्थेचे कार्यालय इंदापुर मध्ये असताना भाड्याने कार्यालय घेऊन सभासदांना दिलेला भुर्दंड,विरोधकांनी छापलेल्या पत्रकावर सत्ताधारी संचालक मंडळाने छापलेल्या पत्रकातील शिक्षकांना न शोभनारी शिवराळ भाषा,अॕप खरेदी मधील लुट,मागील संचालक मंडळापेक्षा वाढलेला १३ लाख रुपये जादा खर्च,शिक्षक कल्याण निधी सभासदांना मयत होऊन २ वर्षे झाली तरीही न देणे,कल्याण निधीची लुट, तसेच संस्थेचे सभासद सुनिल वाघ व किरण म्हेत्रे यांनी कलम ३२ अन्वये मागितलेली संस्थेची माहिती सभासदांना न देणे,सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे या विषयांवर सभासद व शिक्षक समितीचे नेते किरण म्हेत्रे,जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ,तालुका अध्यक्ष ज्ञानदेव बागल,हरिष काळेल,नितीन वाघमोडे,संजय लोहार,विनय मखरे,संतोष हेगडे,सावता भोंग,ज्ञानदेव चव्हाण,संदिपान लावंड,देवानंद जमदाडे इत्यादी सभासदांनी सत्ताधा-यांना धारेवर धरले
.एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर चेअरमन व सचिवांना देता आले नाही त्यामुळे संचालक मंडळाचा निषेध करण्यात आला.
संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे,वार्षिक सभेत एकाही उपविधी दुरुस्तीवर चर्चा न झाल्याने सभासद नाराज असुन फक्त सभासदांची लुट सुरु असुन या संचालक मंडळाला हद्दपार करण्यासाठी शिक्षक समिती खंबीर भुमिका घेणार आहे. असेही श्री वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले