इंदापूर ता. 3 : इंदापूर विधानसभा मतदार संघातून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. तो जो निर्णय घेतील तो आपणाला मान्य असेल. असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी चौफेर न्यूजशी बोलताना केले.
सध्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. तर आमदार दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार असल्याने ते देखील पुन्हा विद्यमान आमदार असल्याने इच्छुक आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीतील इंदापूरची ही जागा भरणे व पाटील या दोन्हीही दिग्गज नेत्यांपैकी उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार कोणाला देणार ? व कोणाला महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर करणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अशातच श्री भरणे हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना चौफेर न्यूजच्या संपादकांनी श्री भरणे यांना महायुतीची उमेदवारी आपणाला न मिळता फडणवीस व पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना जाहीर केली तर आपण काय कराल ? असा प्रश्न विचारला
यावर श्री भरणे म्हणाले,” सर्वात प्रथम मी श्री पवार व श्री फडणवीस यांनी दिलेला निर्णय मान्य करीन. व सर्वात आधी विधानसभा निवडणुकी करता श्री पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीन. व सर्वात आधी त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी प्रचाराला सुरुवात करेल. असे उत्तर श्री भरणे यांनी दिले.