बारामती ता. 19 : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे येथील विमा प्रतिनिधी संजय घोरपडे यांना सलग दुसऱ्या वर्षी एमडीआरटी हा बहुमान प्राप्त झाला.
एमडीआरटी ही एक विमा क्षेत्रातील जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. मागील वर्षी ऑगस्ट मध्ये दुबई येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये चीनमधील मकाऊ येथे होणाऱ्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रतिष्ठित अशी गॅलेक्सी क्लब मेंबरशिप देखील त्यांनी मिळवली आहे. आत्तापर्यंत त्यांनी सहाशेहून अधिक विमा ग्राहकांना 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त चे विमा संरक्षण प्राप्त करून दिले आहे.
या यशासाठी बारामती शाखेचे शाखाधिकारी श्री. हेमंत जोशी व विकास अधिकारी श्री. हनुमंत बोधले यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.