मुंबई ता.20 : महायुतीत सामील होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.. या काळात कोरोनाच्या परिस्थिती असताना देखील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे व पवार यांनी अतिशय उत्कृष्टपणे राज्य सरकारचे कामकाज चालविले होते.
याशिवाय पवार यांच्यावर ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक भरोसा होता. तसेच दोघीही एकमेकाचे कौतुक करत होते.
मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर जवळपास एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु या कालावधीत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर अनेक वेळा राजकीय टीका केली आहे.
त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीनंत अजित पवार महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले व पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.त्यामुळे महाविकास आघाडी सोडून पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी झाल्याने उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीकाटिप्पणी करतील. की काय ? असेच सर्वच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वाटत होते.
परंतु बुधवारी श्री ठाकरे यांनी श्री पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर अजूनही श्री ठाकरे यांचा पवार यांच्यावर व त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अजूनही तेवढाच भरोसा कायम असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीवरून बोलताना श्री ठाकरे म्हणाले,” अजित पवार व आपण अडीच वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांचा स्वभाव मला माहित आहे . त्यामुळे त्यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या श्री पवार यांच्याकडे आहेत.
असे सांगून एक प्रकारे पवार यांच्यावरील उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम आहे. हे दाखवून दिले आहे.
———————————-