शेटफळगढे, ता,20. : मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे फुटलेल्या खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे.
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावासह अन्य तलाव भरण्यासाठी कालव्यातून लवकरच पाणी येणार आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असून खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत द्वारे पाणी सोडले जात आहे .
मात्र गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात कालवा नादुरुस्त असल्याने तालुक्यातील कालव्याला पाणी सोडले जात नाही मात्र येत्या काही दिवसातच कालवा दुरुस्ती पूर्ण केले जाणार आहे.
मे महिन्यात झालेल्या अतुष्टीमुळे निरगुडे परिसरात तलाव फुटून तलावाचे पाणी कालव्यात शिरल्याने खडकवासला कालवा निरगुडे गावाजवळ फुठला होता .
गेल्या काही दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या हितासाठी युद्ध पातळीवर कालवा दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून चालू ठेवले.
आता ते काम पूर्णत्वास गेले असून येथे आठ दिवसात काम पूर्ण करण्याचा मानस जलसंपदा अधिकाऱ्यांनी चौफेर न्यूज शी बोलताना व्यक्त केला.
———-