इंदापूर ता. 21 : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इंदापूर तालुक्यात गट व गणांची रचना प्रसिद्ध झाली असून अंतिम गट रचनेवर 18 ऑगस्टला शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पूर्वतयारीला खऱ्या अर्थाने गती येणार आहे. मात्र इच्छुकांसाठी गट व गण रचनेची निघणारी आरक्षणे महत्त्वाची ठरणार आहेत.
मात्र या निमित्ताने खऱ्या अर्थाने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजप नेते प्रवीण माने यांची खऱ्या अर्थाने आठ जिल्हा परिषद गटातील व 16 पंचायत समिती गणातील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राजकीय कसोटी लागणार आहे.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे –
१. भिगवण-शेटफळगढे गट
भिगवण गण : भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, बंडगरवाडी, कुंभारगाव, मदनवाडी.
शेटफळगढे गण : शेटफळगढे, पिंपळे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, शिंदेवाडी, निंबोडी, अकोले, वायसेवाडी, काझड.
२. पळसदेव-बिजवडी गट
पळसदेव गण : डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी.
बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर,बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण १.
३. माळवाडी-वडापुरी गट
माळवाडी गण : माळवाडी, कालठण २, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी.
वडापूरी गण : वडापूरी, कांदलगाव, तरटगांव, हिंगणगाव, बाभूळगाव, भाटनिमगांव, वडापूरी, गलांडवाडी २, अवसरी, बेडशिंग, भांडगाव.
४. निमगांव केतकी – शेळगाव गट
निमगाव केतकी गण : निमगाव केतकी, व्याहाळी, कचरवाडी (नि.के), गोतोंडी, हगारवाडी.
शेळगांव गण : शेळगांव, कडबनवाडी, रुई, थोरातवाडी, मराडवाडी, शिरसाटवाडी, निमसाखर.
५. बोरी – वालचंदनगर गट
बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगूडवाडी, जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी.
वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी, कळंब.
६. लासुर्णे-सणसर गट
लासुर्णे गण : बेलवाडी, लासुर्णे, थोरातवाडी, जांब, बंबाडवाडी, कुरवली, चिखली, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी.
सणसर गण : सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, तावशी, पवारवाडी, मानकरवाडी, उध्दट, हिंगणेवाडी, घोलपवाडी.
७. काटी – लाखेवाडी गट
काटी गण : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी
लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेटफळ हवेली, भोंडणी, झगडेवाडी, जाधववाडी, खोरोची.
८. बावडा – लुमेवाडी गट
बावडा गण : बावडा, सुरवड, वकीलवस्ती, बोराटवाडी चाकाटी, पिठेवाडी.
लुमेवाडी गण : निरनिमगाव, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, टणू, नरसिंहपूर.