इंदापूर ता .15 : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे रद्द करीत इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सणसर कडे रवाना झाले आहेत.
तालुक्यातील सणसर येथे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. यावेळी भ्रमणध्वनी वरूनच श्री भरणे यांनी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीची माहिती घेतली आहे व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सणसर या ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक या अतिवृष्टीच्या नुकसानी संदर्भात बोरवली आहे.
सणसर कडे प्रवास करत असताना शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनी वरून माहिती घेत आहेत. व अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना देत आहेत.