बारामती ता. 11 : विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सौ. प्रतिभाकाकी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. १२ व शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे २४वे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी कनिष्ठ विभागाची व शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ विभागाची वकृत्व स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी ६ + २ = ८ मिनिटे वेळ देण्यात आला असून वरिष्ठ विमागासाठी रु. ११०००, रु. ७०००, रु. ३००० व रु. १००० आणि कनिष्ठ विभागासाठी रु. १००००, रु. ५०००, रु. २०००, रु. १००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.
दोन्ही विभागांसाठी ‘सांघिक’ स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खळदकर यांनी दिली. बारामतीची ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ ही अखिल महाराष्ट्रात ‘वक्तृत्वाचा मानदंड’ म्हणून नावारुपास आलेली स्पर्धा आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे –
कनिष्ठ विभाग –
१. अस्मानीसुलतानी संकटात भरडलेला शेतकरी
२. कृत्रिम बुद्धिमत्ता व भारताची कृषिप्रधानता
३. संतांनी महाराष्ट्राला दिलेली जीवनमूल्ये
४. राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व – शरदचंद्रजी पवार
५. गाथा – ‘वंदे मातरम्’ची …
वरिष्ठ विभाग –
१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – आव्हाने व उपाय
२. नारायण सुर्वे – भाकरीचा चंद्र शोधणारा कवी
३. कृत्रिम बुद्धिमत्तेने घडविलेली कृषिक्रांती
४. त्रिभाषाविषयक धोरणाचे राजकारण
५. शरदचंद्रजी पवार – एक संघर्षयोद्धा
स्पर्धकांसाठी महत्त्वाच्या सूचना –
१. या वर्षीची वक्तृत्व स्पर्धा ऑफलाईन मोडवर घेण्यात येईल.
२. कनिष्ठ विभागाची स्पर्धा शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी व वरिष्ठ विभागाची स्पर्धा शनिवार, दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल.
३. स्पर्धेची नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८.०० वा. केली जाईल. आपल्या महाविद्यालयाच्या मा. प्राचार्याचे पत्र, स्वतःचे ओळखपत्र, मोबाईल नंबर व बँक डिटेल्स (पासबूक पहिल्या पानाची झेरॉक्स) इ. माहिती नोंदणी करताना जमा करावी.
४. सकाळी ९.०० वा. स्पर्धा सुरू होईल व संध्याकाळी ५.०० वा. पारितोषिक वितरण समारंभात स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र वितरण केले जाईल.
५. बक्षिसाची रक्कम रोख स्वरुपात न देता स्पर्धकाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
६. प्रत्येक संघासाठी २००/- (दोनशे रूपये) नोंदणी शुल्क आकारले जाईल.
७. सन्माननीय तज्ज्ञ परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील.
८. महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर, पदविका या विभागातील विद्यार्थी स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
९. प्रत्येक महाविद्यालयास कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संघ पाठविता येईल. संघातील स्पर्धकांना स्वतंत्र विषयावर बोलावे लागेल.
१०. स्पर्धक महाविद्यालयाचा अधिकृत विद्यार्थी असावा.
११. प्रत्येक स्पर्धकास ६ +२ = ८ मिनिटे वेळ दिला जाईल. वेळेचे बंधन अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे (८१४९१४२४५३),
डॉ. श्रीराम गडकर (९७६४८५००३५), प्रा. सुनील डिसले (९९६०२४८५१७), या स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खळदकर (८९७५०६२८९७), प्रा. शिवाजी टकले (९८६०९९३२१९), प्रा. कल्पना चौधर-खाडे (७३५०४६८२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.







