इंदापूर ता. 31 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित होता. परंतु असे असताना देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी या तिघांमध्ये राजकीय समझोता झाला. व नवीन बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली. पण या बेरजेच्या राजकारणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पदरात काय पडले.. ? याचे उत्तर तालुक्यातील मतदारांना 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून समजणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर जानेवारी महिन्यात पवार भरणे व पाटील या तिघांमध्ये गोपनीय राजकीय समझोता झाला. त्यामुळे यात काय ठरले हे मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही.
पण या राजकीय समझोत्याची चर्चा न करतील ते हुशार मतदार कसले याचेच उत्तर जिल्हा परिषद निवडणुकी वेळी तालुक्यात होऊ लागलेल्या चर्चेतून समजू लागले.
कारण या तिघांमध्ये झालेल्या राजकीय चर्चेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांना जिल्हा परिषदेतील चार विषय समित्यांपैकी एक सभापती पद देण्याचा शब्द दिला आहे. व त्यामुळेच त्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.अशी चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात होती.
परंतु अचानक 28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे आता पवार यांच्यानंतर या चर्चेवेळी या तिघांमध्ये नेमके काय ठरले होते. हे जनतेला येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या चार सभापती पदांच्या निवडीतून समजणार आहे.
जर पाटील यांच्या कन्येची सभापती पदी वर्णी लागली तर जिल्हा परिषद निवडणुकीत वेळी तालुक्यातील मतदारांमध्ये जी चर्चा होती. ती चर्चा खरी होती. या प्रश्नाचे उत्तर मिळेल व नाही मिळाले तर ती फक्त अफवाच होती. याची मतदारांना खात्री पटेल .
परंतु काही झाले तालुक्यातील आगामी राजकारणाची दिशा या सभापती यावरूनच स्पष्ट होणार आहे.
याशिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याप्रमाणेच त्यांच्या कन्या अंकिता याही हुशार अभ्यासू आहेत. व त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा यापूर्वी अनुभव असल्याने त्यांची सभापती पदी वर्णी लागल्यास पाटील यांच्या समर्थकांना मध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. तसेच तालुक्याला ही या पदाच्या माध्यमातून फायदा होणार आहे.
त्यामुळे 2 एप्रिलच्या जिल्हा परिषदेतील सभापती पदाकडे निर्णयाकडे तालुक्यातील जनतेचे व मतदारांची लक्ष लागणार लागले आहे.







