भिगवण ता.२१ महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीला शनिवारी २२ जुलै रोजी ६१ वर्षे पूर्ण होत असून , या स्थापना दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या पुढाकाराने विविध उपक्रम आयोजिले आहेत ,
रविवारी २३ जुलै रोजी शिक्षक समिती च्या स्थापना दिनाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकारिणी नेतृत्व विकास कार्यशाळा अयोजिली असल्याची माहिती शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ आणि जिल्हा सरचिटणीस संदीपआप्पा जगताप यांनी निवेदनाद्वारे दिली .
तापडिया नाट्यमंदिर , निराला बाजार , छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी २३ जुलै रोजीच्या नियोजित कार्यकारिणी नेतृत्व कार्यशाळेस शिक्षक समिती चे राज्यनेते उदय शिंदे , राज्य अध्यक्ष विजय कोंबे , राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि माजी राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे , डी. पी. जाधव , गोपाल तुरे आणि विजय साळकर मार्गदर्शन करणार असल्याचे राज्य शिक्षक समिती चे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर , जिल्हा शिक्षक नेते शरद निंबाळकर , विभागीय संघटक चंद्रकांत डोके यांनी सांगितले .
. राज्य कार्यकारिणी , राज्यातील सर्व जिल्हा शाखा प्रमुख पदाधिकारी , तालुका शाखा , महिला आघाडी , शिक्षक समितीच्या उर्दू आणि डी. सी. पी. एस . शाखेचे पदाधिकारी , शिक्षक बँकांचे आणि जिल्हा, तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व विद्यमान कार्यकारी मंडळ, संचालक उपस्थित राहणार असल्याचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी , कोषाध्यक्ष सुनील लोणकर , संपर्कप्रमुख बापू जाधव यांनी स्पष्ट केले .