पळसदेव ता . १७. पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडु यांना सुमारे पंचवीस हजार रुपये रकमेची रोख बक्षीसे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
दरम्यान विद्यालयात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी, सामुदायिक कवायत,स्काऊट गाईड संचलन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता १ली ते १२वी पर्यतचें प्रथम तीन क्रमांक तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला . १०वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनी सिद्धी बनसुडे प्रिया शिरसट संज्योत सपकळ तसेच १२वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनी तनुश्री मत्रे मृणाल काळे प्रतिक्षा देवकाते जयश्री जगताप साक्षी राजमाने समय दोशी विश्वतेज देवकर आदित्य कदम सोहम राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे देण्यात आली .
पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी अभिजित ढेरे यांचाही सन्मान करण्यात आला .राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धतील प्राविण्य मिळवणारा खेळाडु प्रज्योत काळे , उदयसिंह काळे , शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थीनी वैष्णवी गायकवाड वैष्णवी सपकळ यांचाही सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला .
शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रकाशभाऊ काळे यांच्या स्मरणार्थ विद्यमान अध्यक्ष भूषण काळे, राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, केशर मल्हार शिष्यवृत्ती, मातोश्री शिष्यवृत्ती, पंडित पोतदार फाउंडेशन ,निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब गांधले, विजयकुमार काळे प्रकाश भोसले अमिन मुल्ला, हिराजी काळे आदि बक्षीस दात्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पंचवीस हजार रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस, शालेयपयोगी साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा प्राचार्य बाळु काळे यांनी घेतला .
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, खजिनदार बबन काळे, संचालक बाळासाहेब नायकवाडी , पळसदेवचे सरपंच ग्रामसेवक विविध संस्थाचे पदाधिकारी, माजी सैनिक, विद्यालयाचे माजी सेवक प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक संजय जाधव तानाजी इरकल, अशोक जाधव , शिक्षक शिक्षकेतर, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. आभार अविनाश शेलार यांनी मानले..