शेटफळगढे ता.20 : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे . व तो कालावधी वाढवावा. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यापूर्वी तालुक्यात सोडण्यात आलेल्या आवर्तन केवळ सात दिवस चालले होते. तर सध्या मागील दहा दिवसापासून खडकवासला कालव्याचे इंदापूर तालुक्यात आवर्तन चालू आहे. परंतु ते आवर्तन अत्यंत कमी क्यू सी एस वेगाने तालुक्यात पोहोचत असल्यामुळे तालुक्यातील शेती सिंचना विना अजून तशीच आहे.
अशातच सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत . उसाच्या लागणी देखील झालेले नाहीत. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले आहे. मात्र सध्या खडकवासला धरणामध्ये जवळपास 90 टक्के पाणी झाले आहे.
त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी 11 ऑगस्टपासून आवर्तन सोडले आहे. मात्र हे आवर्तन तालुक्यात नुकतेच पोचले आहे. परंतु इंदापूर तालुक्यात या आवर्तनाचे पाणी कमी क्युसेस वेगाने येत आहे त्यामुळे अजूनही पाणी इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या सिंचित भागात अर्थात टेलला सिंचनासाठी चालू आहे
मात्र अजून खडकवासला कालव्याच्या वितरिकांना व तलावात पाणी सोडले नसल्याने तालुक्यातील जवळपास 50% टक्के शेती सिंचना विना तशीच आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा कालावधी वाढवावा. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र अजूनही राहिल्याने या आवर्तनाच्या काळात आणखी दोन ते तीन दिवस वाढ होऊन ते पंधरा दिवसा ऐवजी एकूण 17 किंवा 18 दिवसाचे तालुक्यात होणार आहे.
म्हणजेच अजून जवळपास सात दिवस आवर्तनाच्या तालुक्यातील कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती अधिकृत चौफेर न्यूजला मिळाली आहे
———————————–