इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा जन्म बावडा गावी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पाटील कुटुंबात 21 ऑगस्ट रोजी झाला
सुरुवातीचे शिक्षण बावडा इंदापूर येथे झाल्यानंतर पुणे येथे त्यांनी कृषी व कायद्याची पदवी शिक्षण घेतले.कै.शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांचा विचार त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही झाले.
इंदापूर तालुका आपले कुटुंब समजून तालुक्याच्या जनतेची त्यांनी सेवा केली आहे व आजही करीत आहेत. अकलूजच्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांची राजकीय सुरुवात झालीनंतर पुणे जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा दूध संघाचे संचालक अशी पदे भूषवली होती. .
सन 1995 विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने महाराष्ट्राच्या राजकारणातील या कोहिनूर हिऱ्याला 1995 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहूनही विक्रमी मतांनी विजयी केले व आमदार बनवले त्यानंतर,अनेक संघर्षाच्या मार्गातून पुढे जात संघर्ष करत अल्पावधीतच महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या पाच प्रभावशाली नेत्यांमध्ये स्थान मिळविले. त्यामुळेच आमचे पाटील साहेब पुढे वीस वर्ष राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर विविध खाती सांभाळली अनेक महत्त्वाचे निर्णय राज्यातील जनतेसाठी घेतले .
या काळात तालुक्यात निरा-भिमा कारखाना,दूधसंघ,इंदापूर बँक,पंचतारांकित एमआयडीसी,शिक्षण संस्था,वाहतूक संघ असे मोठे प्रकल्प व संस्था उभ्या केल्या. व नावा रुपाला आणल्या. इंदापूर नजीकच्या लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योग आणले
त्यामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळाला औद्योगिक वसाहतीतील कारखान्याची संबंधित विविध व्यवसाय चालू होऊन आर्थिक उलाढाल वाढले आणि त्यामुळे तालुका सर्व बाबतीत संपन्न झाला.
शेतीला पाणी,वीज,रस्ते शेतमालाला भाव देऊन जनतेचे जीवनमान उंचावण्याचा फार मोठा यशस्वी प्रयत्न केला,त्यांच्या दूरदृष्टीने तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला.
सिंचनाच्या बाबतीत इंदापूर तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्र उच्च स्थानी नेऊन ठेवले. तालुक्यातील गोरगरीब जनतेची कामे केली अनेकांना नोकरीला लावले. प्रत्येक कुटुंब हे आपलेच कुटुंब आहे असे समजून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सुखदुःखात उभे राहिले
म्हणूनच मागील नऊ वर्षापासून आमच्या पाटील साहेबांकडे सत्ता नसली तरी केवळ दोन जणांचा अपवाद वगळता तालुक्यातील खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करणारा एकही जिवाभावाचा गावोगावचा कार्यकर्ता आमच्या आदरणीय पाटील साहेबांना सोडून गेलेला नाही.
म्हणूनच आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणाने याच गोरगरीब जनतेच्या जोरावर व विश्वासावर व पाठिंब्यावर आदरणीय भाऊंचा विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित होणार आहे.
म्हणूनच अशा या सुसंस्कृत, उच्च विद्या विभूषित इंदापूरच्या जनतेच्या हृदयातील कोहिनूर हिरा व आमचे दैवत माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂🎂🎂
शुभेच्छुक श्री. सुनिल काळे
उपाध्यक्ष इंदापूर तालुका भाजपा
सदस्य ग्रामपंचायत डिकसळ
श्री.हनुमंतराव काजळे पाटील
उपाध्यक्ष इंदापूर तालुका भाजपा
उपसरपंच ग्रामपंचायत निरगुडे
( शब्दांकन विनायक चांदगुडे संपादक चौफेर न्यूज)
( लेखकाच्या व चौफेर न्यूजच्या परवानगी शिवाय वरील लेखाची कोणीही कॉफी करू नये )