शेटफळगढे . ता.२८ : शेटफळगढे (ता इंदापूर) येथे पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलाव व आरोग्य केंद्रासाठी जागा देण्यावरून ग्रामसभा वादळी झाली मात्र निर्णय एक मताने घेण्यात आला.
येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावच्या पाणी योजनेसाठी गावालगत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २३१ गटामध्ये साठवण तलावाला जागा देण्यासाठी व त्याच गटात प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीसाठी जागा देण्यावरून दोन गट पडले होते त्यानंतर या दोन्ही विकास कामांना जागा देण्यासाठी सरपंच राहुल वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी यापूर्वी गट नंबर ३५६ मधील साठ आर क्षेत्र देण्याची शिफारस करण्यात आली होती मात्र या जागेवर बांधकाम करण्यावरून मतभेद झाले होते काही ग्रामस्थांनी २३१ गटामध्येच करण्यात यावे अशी मागणी केली होती तर काहींनी पूर्वी दिलेल्या जागेतच करावे अशी मागणी केली होती यावर शेवटी ग्रामस्थांनी तोडगा काढून २३१ गटांमध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करावे व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी गट नंबर ५०३ मध्ये करण्याचे ठरले त्यासंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शनही घेण्याचे ठरले या विषयाचा ठराव ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव भोसले यांनी मांडला तर यावर दत्तात्रय शिरसट यांनी अनुमोदन दिले
या ग्रामसभेस इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष वाबळे ,माजी सरपंच बापूराव वाबळे, हनुमंतराव वाबळे, पोलीस पाटील रखमाजी सवाणे संतोष सवाणे, दादा मचाले ,सागर वाबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक नागनाथ गर्जे यांच्यासह व ग्रामस्थ उपस्थित होते.