पुणे ता. 29 : आंतरभारती पुणे युनिट आणि नेस वाडिया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया महाविद्यालयात ” कविता राष्ट्रीय एकात्मतेच्या” या बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवींच्या बरोबर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने विविध भाषांमधील कविता सादर केल्या.
पू. साने गुरुजींच्या संकल्पनेला अभिप्रेत असेच हे संमेलन झाले. आंतर भारती पुणे युनिटने स्वातंत्र्य दिनानिमित्त बहुभाषिक कविसंमेलन पेश करण्याचा पायंडा सुरू केला, त्याचे हे तिसरे वर्ष आहे.विशेष बाब म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी भाषांमधील कवितांसह कन्नड आणि बंगाली भाषांमधील कविताही समोर आल्या ,
प्रसिद्ध कवी उद्धव कानडे अंजली कुलकर्णी ज्योत्स्ना चांदगुडे आश्लेषा महाजन प्राचार्य डॉ वृषाली रणधीर आणि उप प्राचार्य डॉ प्रकाश चौधरी सविता कुरुंदवाडे, स्वाती दाढे यांच्या कविता विद्यार्थ्यांनी फार आत्मीयतेने ऐकल्या. सविता कुरुंदवाडे यांनी सूत्र संचालन केले.
प्राचार्य डॉ वृषाली रणधीर आणि उप प्राचार्य डॉ प्रकाश चौधरी यांनी फार उत्तम नियोजन केले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी चे ट्रस्टी डॉ. सचिन सानप आंतर भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ डी एस कोरे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. पुणे शाखेचे सचिव श्री माने उपस्थित होते .
आंतर भारतीची अध्यक्ष म्हणून एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन अंजली कुलकर्णी यांनी केले .