शेटफळगढे ,ता 19 : निरगुडे (ता. इंदापूर) येथील शेतकरी आप्पासो जगन्नाथ लकडे या शेतकऱ्याने आठराशे किलोमीटरचा प्रवास करून होस्टेल जातीच्या गाय आणण्याचे धाडस केले आहे. हरियाणा राज्यातील कर्नाल या येथून एचएफ जातीच्या नऊ गायी आणल्या आहेत.
हरियाणा राज्यातील एचएफ या जातीच्या गाईंना उच्च प्रतीचे सिमेंस भरले जाते त्यामुळे त्या गायी मध्ये चांगल्या तब्येतीच्या व त्यांच्यात दूध देण्याची क्षमता चांगली असते म्हणून या शेतकऱ्याने विमानाने जाऊन गायी आणण्याचे धाडस केले. हरियाणातून गाय आणताना हरियाणा राज्य सरकारचा परवाना घेऊन या गायी चार मुक्काम करून निरगुडे येथे दोन सप्टेंबर रोजी आणल्या आहेत होस्टेल जातीच्या या गायी मधील काही गायी वीस ते पंचवीस लिटर प्रतिदिन देण्याची क्षमता असते याचे सर्वाधिक प्रमाण आपल्या परिसरात आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या दूध उत्पन्न वाढीसाठी ३० ते ३५ लिटर क्षमतेच्या या गायी आणत आहेत या गायी आणताना दिवसभर मुक्कामाच्या ठिकाणी गायीना विश्रांती दिली जाते चारा दिला जातो व रात्रीचा प्रवास करून या गायी आणल्याने या गाई सुखरूप पोचले आहेत.
——————————–