इंदापूर ता.2 खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील सर्व तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे. आज रात्रीपासून प्रत्यक्षात तलावात पाणी सोडले जाणार आहे.याबाबतच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांना दिल्या आहेत. या सूचनेनुसार आज रात्रीपासून तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.
सध्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने सध्या खडकवासला प्रकल्पावरील तालुक्यातील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. याशिवाय पिके देखील पाण्याला आलेली आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांमध्ये पाणी सोडावे .
अशा सूचना आमदार श्री भरणे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने सध्या असलेल्या पाणी साठ्याची माहिती घेतली. व श्री भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील प तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार सर्व खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.