.भिगवण ता. 16 : भादलवाडी येथील बिल्ट कंपनीच्या अनागोंदी कारभारावरून अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदन देऊन मागण्याची पूर्तता पंधरा दिवसात करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी बील्ट पेपर कंपनीचे व्यवस्थापक ,माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक व भिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांची मराठा महासंघाचे पदाधिकारी यांचेसह बैठक दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालयात बोलावली आहे. तशी नोटीस पाठवली आहे
बिल्ट पेपर कंपनीतील सन 2011पासून प्रतिक्षा यादीत ठेवलेल्या माथाडी कामगारांना नियमानुसार न्याय मिळत नाही .स्थानिक तसेच माथाडी व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि कंपनीचे नोकर भरती मधील अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवण्यासाठी मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी निवेदन दिले होते आणि 15 दिवसात मागण्या मान्य करुन तसा लेखी खुलासा करावा अशी मागणी केली होती.याबाबत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . त्यांनतर कंपनीने आणि संबधित प्रशासनाने सदर निवेदनाची काहीं दखल घेतलेली नव्हती म्हणून पुन्हा समरणपत्र देऊन 28 ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलनं केलें जाईल असे निवेदन दिले होते पूर्वी दिलेल्या निवेदनावर कंपनीने असमाधानकारक खुलासा केला आहे परंतू या प्रशामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचां प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार श्री श्रीकांत पाटील यांनी लक्ष घालून संबधितांची मीटिंग लावली आहे. यामध्ये काय मार्ग निघतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर मराठा महासंघाचे निवेदनाची दखल घेतली नाहि जर आंदोलनं करण्याची वेळ आली तर त्यासाठी परिसरातील भिगवणसह मदनवाडी, तक्रारवाडी ,डिकसळ, कुंभारगाव,डाळज 1,2,3 , शेतफळगढे पिंपळे स्वामीचिंचोली , खानवटे इ .ग्रामपंचायत सरपंच यांनी तसेच लोकशासन आंदोलन भिगवण परिसरातील अनेक सामाजिक, राजकीय , अनेक सोसायट्या,तरुण मंडळांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तसेच आंदोलनात सहभागी होणेचे लेखी जाहीर केले आहे..याबाबत आता तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
*याबाबत बोलतांना मराठा महासंघचे पूणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप म्हणाले की.*
मराठा महासंघ ही एक सामजिक संघटना माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे त्यामूळे संघटनेकडे आलेल्या बिल्ट कंपनीमधील विविध प्रश्नांसाठी संघटनेने निवेदन दिले आहे यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक कंपनी विरोधात रोष नाहि त्यामूळे कंपनी प्रशासनाने तसा कोणताही अर्थ न काढता निवेदनात दिलेले प्रश्नावर तात्काळ कायदेशीदृष्ट्या मार्ग काढावा अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला सनदशीर मार्गानें मोठें जन आंदोलनं भिगवण परिसरातील सर्व सामजिक राजकिय तसेच युवक यांना सोबत घेउन उभारावे लागेल सदर आंदोलनात मराठा महासंघाचे राष्ट्रीय नेते सामील होतील मग त्यातून होणारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नास कंपनी प्रशासन आणि संबधीत प्रशासन जबाबदार राहतील.. यांची गांभीर्याने नोद घ्यावी..