इंदापूर ता.३ : आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी सतत पाठपुरावा करून निधी व योजना आणत असतात. त्याचाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातील जनतेला या एकाच आठवड्यात आला. एका आठवड्यात आमदार दत्तात्रय भरणे यांनी आजवर तालुक्यात कोणालाही जमले नाही असे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे पाच प्रश्न मार्गी लावले. एकाच आठवड्यात हे पाच प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला एक प्रकारे पंचामृताचीच भेट दिली आहे. कारण हे गिफ्ट तालुक्यातील जनतेसाठी अमृताप्रमाणे आहे त्यातून तालुक्यातील जनतेच्या जनतेच्या एक प्रकारे आयुष्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम श्री भरणे यांनी केले आहे. त्यामुळे श्री भरणे यांनी भेट दिलेल्या या पंचामृत गिफ्टची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सुरू झाली आहे.
लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे इंदापूर तालुक्यातील 10 व बारामती तालुक्यातील 7 अशा एकूण 17 गावातील शेतकऱ्यांनी आपली जिरायत शेती बागायत होण्याचे पाहिलेले स्वप्न आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अखेरीस 37 वर्षानंतर मार्गाला लागले आहे आमदार श्री भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेसाठी जवळपास 348 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे याशिवाय या आठवड्यात या योजनेबाबतची आवश्यक असणारी पर्यावरण विषयक जन सुनावणी ही पार पडली. त्यामुळे या योजनेच्या अंमल बजावणीच्या दृष्टीने पाऊल एक एक पाऊल पुढे पडू लागल्याने शेतकऱ्यांसाठी आमदार भरणे यांनी दिलेले या आठवड्यातील हे पहिले गिफ्ट होते.
तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा शब्द दिला होता अखेरीस तो शब्द भरणे यांनी खरा करून दाखवला.
खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला. व प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खंडकरी या शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे हा निर्णय या शेतकऱ्यांसाठी दुसरे गिफ्ट होते.
तसेच गावाच्या गावठाण हद्दीपासुन ५ किलोमिटरच्या परिसरातील जमिनीबाबत शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणेसही परवानगी देण्याबाबतचाही निर्णय श्री भरणे यांच्या पाठपुराव्यावरून व विधिमंडळाच्या अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावरून सरकारने घेतला. हे देखील गाव गावच्या विकास कामांना जागे अभावी अडचण येत होती ती दूर व्हावी. व गावोगावच्या विकास कामांना गती देण्यासाठी या निर्णयाचा उपयोग होणार असल्यामुळे हे देखील तालुक्यातील गावांसाठी व जनतेसाठी हे तिसरे गिफ्ट ठरले आहे.
इंदापूर शहरातील छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चादशहावली बाबा दर्गाह संवर्धन करण्यासाठी आमदार श्री भरणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला व त्याचा पाठपुरावा करून 38 कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला. हे तालुक्यातील जनतेसाठी आमदार भरणे यांनी या आठवड्यात दिलेले चौथे गिफ्ट होते.
तर श्री भरणे यांनी 28 वर्षाच्या कालावधीनंतर उजनी धरणात मच्छिमार बांधवांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून एक कोटी मत्स्य बुटकुली मत्स्य विभागाच्या मदतीने सोडली. हे तालुक्यासाठी दिलेले पाचवे गिफ्ट होते.
अशाप्रकारे आमदार भरणे यांनी एकाच आठवड्यात इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी या पंचामृतात प्रमाणे सर्वांना उपयोगी अशी पाच गिफ्ट दिल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे . त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार दत्तात्रेय भरणे यांचे ग्रामस्थ भेट घेऊन कौतुक व सत्कार करीत आहेत. त्याचबरोबर येत्या सात डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार भरणे तालुक्यासाठी विकास कामांसाठी निधी व इतर योजनांच्या बाबतीत काय गिफ्ट देतात ? याकडे तालुक्यातील जनतेचे आता लक्ष लागले आहे.
—————————————