इंदापूर ता.9 : सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विम्याची योजना आणली खरी परंतु विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनाच आता बनवाबनवी करण्यास सुरुवात केली आहे कारण खरिपाचा हंगाम उलटल्यानंतर रब्बीतील पिके काढणीच्या टप्प्यात आता आले आहेत आणि विमा कंपन्या खरिपातील पिकांची पाहणी करण्यात दंग आहेत विमा कंपन्यांच्या या वरातीमागून या मनीप्रमाणे सध्या कामकाज चालू असल्याने यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
सरकारने एक रुपयात खरीप हंगामाचा विम्याची घोषणा केल्यानंतर उर्वरित विम्याची रक्कम सरकार भरणार आहे सरकारने सरसकट शेतकऱ्यांना 25 टक्के विम्याची रक्कम मुस्कानेपोटी देण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांनाच खऱ्या अर्थाने बसवायला सुरुवात केली आहे कारण खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता विमा कंपन्यांचे प्रतिनिधी जात आहेत व त्या नुकसानीची पाहणी करत आहेत आता खरीप हंगामातील पिके निघून शेतकऱ्यांतील शेतकऱ्याची रब्बी हंगामाची पिके काढणीच्या टप्प्यात आले आहेत आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकाची पाहणी करत आहेत त्यामुळे विमा कंपन्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे आज मसोबावाडी व निरगुडे परिसरात विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध केला खरीप हंगाम संपल्यावर कशाचे तुम्ही पंचनामा करता सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या असे म्हणत शेतकऱ्यांनी त्या फॉर्म वरती स्वाक्षरी करण्यास नकार दिला हीच कंपनी इंदापूर तालुक्यात आहे त्यामुळे इंदापूर सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या कंपन्यांच्या विरोधात सरकारकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन सरसकट तत्काळ सर्व शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.