इंदापूर ता. 24 म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी मारुती पवार यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत म्हसोबाचीवाडी येथे आज सरपंच राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवीन उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये उपसरपंच पदासाठी सौ राणी मारुती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी ग्रामसेविका सौ सोनाली गवळी लोकनियुक्त सरपंच श्री राजेंद्र महादेव राऊत ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय काशिनाथ राऊत श्री मोहन दाभाडे सौ कमल विलास पवार सौ सविता अशोक मराळ सौ माधुरी श्रीकांत चांदगुडे सौ सुप्रिया कुंदन चांदगुडे उपस्थित होते.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री संदीप बाळासाहेब पवार ,श्री मारुती पवार श्री महादेव नांदगुडे ,दत्तात्रय पवार, श्री प्रशांत चांदगुडे, संदीप चांदगुडे श्री कुंदन चांदगुडे, गणपत साळुंखे श्री निलेश पवार, सौरभ पवार, लक्ष्मण शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते