इंदापूर ता.4. : निरगुडे, (ता. इंदापूर ) येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या इंदापूर तालुका अध्यक्षा सौ. साधनाताई केकाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधक्ष्या रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या.
यावेळी चाकणकर बोलताना म्हणाल्या, या हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून नवा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेस करत आहे. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. विधवा भगिनींना पूर्णांगिनी म्हणून संबोधत त्यांना प्रत्येक धार्मिक कार्यात स्थान देऊन सहभागी करून घेतले पाहिजे,
कमी वयात मुलींचे लग्न करण्याऐवजी त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करावे, आपल्या मुलींच्या पाठशी आई म्हणून ठामपणे उभे राहावे असे आवाहन करतानाच हुंडा प्रथा व विधवा प्रथा बंदीसाठी ठराव करण्याचे आवाहन उपस्थित महिला भगिनींना केले.
महाराष्ट्रात ५०० हुन अधिक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंदीचे ठराव करून खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला आहे. महिलांच्या हक्कांची माहिती महिलांना व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचण्याचे महत्व देखील पटवून सांगितले.
यावेळी महिला भगिनींसाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ चाकणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. रोजच्या जीवनातून विरंगुळा म्हणून मोठ्या संख्येने महिलांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या अधक्ष्या सारीकामामी भरणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य समन्वयक जयश्रीताई पालवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैशालीताई पाटील, मोनिकाताई हरगुडे जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा माजी पंचायत समिती सदस्या शितलताई वणवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या इंदापूर तालुका अधक्ष्या साधनाताई केकाण, अनुष्काताई भरणे, उज्वलाताई परदेशी, वंजारवाडीच्या उपसरपंच राणी चौधर, ग्रामपंचायत सदस्य चिन्मयानंदा चौधर, मनीषाताई चौधर, मदनवाडी गावच्या माजी सरपंच सारीकानानी बंडगर, मदनवाडी सरपंच अश्विनीताई बंडगर व भिगवणच्या माजी सरपंच हेमाताई माडगे, कविता भोसले यांच्यासह निरगुडे गावातील व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
…………….