इंदापूर – दि.८ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , पुणे व श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. नारायणदास रामदास हायस्कुलच्या प्रांगणात तालुकास्तरीय शासकीय आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड.मनोहर चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार , तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले , पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच विध्यार्थी खेळाडू यांच्या समवेत सहभागी होत हॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ खेळातून पुढे येण्यासाठी या स्पर्धांना महत्व असून या सारख्या स्पर्धेतून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्व सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ओळखून आपला पाल्य हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे.यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये विद्यार्थी चमकलाच पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोरटे यांनी केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर आणि नितिन भोसले यांनी केले.आभार दादा चौधरी यांनी मानले.
क्रीडाप्रमुख यशवंत केवारे, संयोजक क्रीडा शिक्षक रामदास देवकर, संतोष पवार व सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.