पुणे ता. 20 सन 2023 चे राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार 11 शिक्षकांना प्रदान करण्यात आले.साहित्यदीप प्रतिष्ठान च्या ” राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार -२०२३ ” च्या वितरण सोहळा पुण्यातील ,’ स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात संपन्न झाला. .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील एस एन डी टी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.अश्विनी धोंगडे होत्या.अध्यक्षांच्या सत्कारानंतर ,साहित्यादीप च्या अध्यक्ष, सुप्रसिद्ध कवयित्री आणि स्वतः मुख्याध्यापक राहिलेल्या ज्योत्स्नाताई चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले.आपल्या प्रास्ताविकात संस्थेची थोडक्यात माहिती तर दिलीच पण सर्व ११ पुरस्कारार्थी शिक्षकांची थोडक्यात माहितीही करून दिली.
त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेल्या धोंगडे मॅडम यांच्या हस्ते या 11 जणांना,शाल ,श्रीफळ ,सन्मान पत्र ,सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये मुंबईहुन आलेल्या डॉ.नमिता निंबाळकर, पुण्याच्या डॉ.वर्षा तोडमल , प्रा.चंद्रकांत वानखेडे,मुख्याध्यापक असलेले श्री.भानुदास मालुसरे, मुख्य लिपिक असलेले रमेश धुमाळ ,इंदापूर येथून आलेल्या वर्षा ननवरे ,ग्रंथपाल असलेल्या सविता सोनवणे ,विशेष शिक्षिका असलेल्या सेवासदन च्या प्रतिभा शिंपी ,परिचारिका असलेल्या प्राजक्ता ताम्हणकर आणि नुकत्याच मुख्याध्यापिका झालेल्या संगीता सावंत घोटवडे व गीता राऊत यांचा समावेश होता.
विविध प्रकारच्या शिक्षकांची निवड पाहून अध्यक्षांनी अतिशय समाधान व्यक्त तर केलेच . आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षकांचे मुलांवर व मुलांचे शिक्षकांवर निष्पाप प्रेम असेल तरच शिकणे व शिकवणे सहजसाध्य होते आणि तरच शिक्षणाचा हेतू ही साध्य होतो.
सर्वांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना डॉ.वर्षा तोडमल यांनी साहित्यादीप चे आभार तर मानलेच पण शिक्षकांच्या खडतर जीवनात ,शिक्षकांचे असे कौतुक करणारी साहित्यदीप सारखी बेटे आहेत म्हणून समाधान ही व्यक्त केले. आपल्या छोट्याश्या मनोगताचा शेवट करतांना त्यांनी ऐकवलेली मंगेश पाडगांकर यांची रचना खूपच दाद घेऊन गेली.नंतर अश्विनी जगताप ,प्राजक्ता पटवर्धन ,वि.दा.पिंगळे आणि मृणालिनी कानिटकर यांनी समाज सुधारकांचे शिक्षणाविषयी महत्त्व सांगितले
या कार्यक्रमाची कल्पना आणि नियोजन मृणालिनी कानिटकर यांचे होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका, दीपाली बोरसे यांनी केले त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष अश्विनी धोंगडे व साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या सोबत संस्थेचे सल्लागार श्री.वि.सु.चव्हाण व कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.