पळसदेव दि.1- पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाची मल्ल अहिल्या शिंदेची राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे यांनी दिली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड (कोल्हापूर )येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात ६१ किलो वजन गटात अहिल्याने प्रथम क्रमांक मिळवला . तिची भोपाळ (मध्यप्रदेश ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी ( नॅशनल )निवड झाली आहे. यापूर्वीही अहिल्याने पाच वेळा नॅशनल कुस्ती स्पर्धा कॅटेड स्पर्धा एशियन चॅम्पियनशीप मध्ये यश संपादन केले आहे . यशस्वी मल्ल व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक नितीन जगदाळे ,सिकंदर देशमुख ,सुवर्णा नायकवाडी ,रामचंद्र वाघमोडे यांचा पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे , पळसदेवचे सरपंच अजिनाथ पवार , प्राचार्य बी एस काळे ,पर्यवेक्षक विकास पाठक ,मल्हारी काळे , तानाजी इरकल वृषाली काळे, शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी* केले.