शेटफळगढे ता.17 : म्हसोबावाडी (ता इंदापूर) येथे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे आदेशानुसार आपत्ती निवारण दिनाच्या निमित्ताने आपत्ती निवारण बाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले..
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 1077 , 108, 112 आपत्कालीन क्रमांक वापरा बाबत माहिती दिली, यावेळी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणे भूकंप, पूर, ढगफुटी , उष्णतेची, थंडीची लाट, चक्रीवादळ, आग, वनवा ईत्यादी बाबत उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मानवनिर्मित आपत्ती अपघात, युद्ध, अपघातातील रूग्णांना मदत करणे, रूग्णांना उपचार करणे, उचलण्याची पद्धत, त्यांना CPR देणे ईत्यादी बाबत माहिती दिली.
वीज पडण्यापासून वाचण्यासाठी शासनाचे दामिनी aap बाबत माहिती देवून विजेपासून बचाव करण्यासाठी माहिती दिली.
आपदा मित्र तुषार झेंडेपाटील यांनी मार्गदर्शन केले तर आपदा मित्र अभय नांदखिले व संकेत भोसले यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष अलकाताई झेंडे, सदस्य संदीप चांदगुडे, मुख्याध्यापक भोंग सर, पाठक मॅडम, शिक्षिक, विद्यार्थी प्राथमिक शाळा व हायस्कूल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.