नवी दिल्ली ता.13: संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झाली असताना आज सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान अचानक दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून संसदेत घुसखोरी केली. देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे काम संसदेत व्यवस्थितपणे सुरू असताना अचानक गॅलरीतून उड्या मारून दोन तरुण उड्या मारून पुढे अध्यक्षांच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. व बुटातून वस्तू काढून धूर या युवकांनी सोडला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या दोघाही जणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत संसदेचे कामकाज थांबवण्यात आले आहे. . परंतु संसदेची सुरक्षा भेधुन या तरुणांच्या वस्तू थेट संसदेत गेल्याच कशा याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोघांसमवेत आणखी दोघेजण बाहेर होते अशी माहिती समोर येत आहे. संसदेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. आता संसदेच्या कामकाजाला दोन वाजता पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे.