बारामती ता. 25 : विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि बही:शाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे त्यांच् तीया संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 यादरम्यान डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली.
या व्याख्यानालाचे प्रथम पुष्प श्री प्रदीप कदम यांनी “आदर्श महामानवांचा”या विषयावर विचार व्यक्त करून गुंफले. “आजच्या युवा पिढीला यशवंतराव चव्हाण, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज ,सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले अशा आदर्श महामानवांच्या विचाराची नितांत गरज आहे” असे प्रतिपादन श्री प्रदीप कदम यांनी केले.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राचार्य शिंदे म्हणाले-” बाहि:शाल शिक्षण मंडळाच्या या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश म्हणजे क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जाऊन समाज सुधारक व महामानवांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत.” या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना प्रा. राजकुमार कदम यांनी बाहिशाल शिक्षण मंडळ व “डॉ बाबााहेब जयकर व्याख्यानमाला” याबाबतचा इतिहास सांगून पार्श्वभूमी स्पष्ट केली. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प श्री मारुती श्रीरंग करंडे यांनी आपल्या ओघ वत्या शैलीत गुंफले.”जो हसतो तो देवाची प्रार्थना करतो आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करतो”असा संदेश देत श्री करंडे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना दोन तास आपल्या वक्तृत्वाने मनमुराद हसवले. वेगवेगळ्या पक्षी व प्राण्यांचा आवाज काढून निसर्गाचे संवर्धन आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे अन्यथा विकासाच्या नावाखाली विनाश अटळ आहे ,असंही स्पष्ट केले.
व्याख्यान मालेचे तृतीय पुष्प गुंफताना डॉ. विलीना इनामदार यांनी “सौंदर्य मनाचे व शरीराचे” या विषयावरती विचार व्यक्त करताना-” मनुष्य जितका शरीराला जपतो तेवढेच मनालाही जपलं पाहिजे. साऊंड माइंड इन साउंड बॉडी इज द सिक्रेट ऑफ सक्सेस”, हा मंत्र त्यांनी युवा पिढीला दिला. ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी प्रा. मंगल गावडे, डॉ. राहुल तोडमल, प्रा. तुषार जगताप डॉ हणमंतराव पाटिल. अँड. तुषार झेंडे पाटील व विद्यार्थी गट प्रमुख यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.