पुणे ता.24 : नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आज पुणे येथे पालकमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रेय भरणे आमदार राहुल कुल,कार्यकारी संचालक अतुल कपोले पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री गुलाने सर अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सर जिल्हाधिकारी सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.
आम्दार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी बैठकीत केली यावेळी बैठकीत केली यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन श्री भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री पवार यांनी दिली.
तर निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार आहेत.








