इंदापूर ता. 28 : वरकुटे बुद्रुक ( ता. इंदापूर) 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जि प प्राथमीक शाळा वरकुटे बुद्रुक येथे आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवा प्रति ष्ठान इंदापूर यांच्यातर्फे शाळेमध्ये विविध स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
जिल्हा परिषद शाळा वरकुटे बुद्रुक येथे आरोग्य संदेश बहुउद्देशीय समस्येवी प्रतिष्ठान इंदापूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येक स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेला विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठांचे अध्यक्ष डॉक्टर संदेश शहा इंदापूर मेडिको असोसिएशनचे अध्यक्ष सुहास पवार सर व संदीप पांढरे उपस्थित होते तसेच गावातील उपसरपंच राहुल घुले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव मोरे पोलीस पाटील पल्लवी देवकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अरुणा कुंभार ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे दिलीप देवकर सोसायटी चेअरमन मोहन राऊत तसेच नवनाथ चितळकर तसेच ग्रामस्थ पालक शिक्षक उपस्थित होते
तसेच संदेश शहा यांनी विद्यार्थी शिक्षक यांच्या विषयी प्रबोधन केले मुख्याध्यापक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं