इंदापूर ता 9 : इंदापूर तालुक्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना नेते जरी सोडून गेले . परंतु असे असले तरी हिम्मत न हारता जिद्दीने उरलेल्या निष्ठावान व गोरगरीब जनतेच्या जोरावर खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान त्यांना होण्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे व प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे.
तालुक्यातील आमदार हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले त्यामुळे तालुक्यात सुप्रिया सुळे यांना कार्यकर्ते मिळतील का नाही ? अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जिद्दी प्रमाणेच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः इंदापुरात लक्ष दिले आहे.
त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात टप्प्यात इंदापुरात गावोगावी दौरे काढले. गावोगावी विविध कार्यक्रम राबवून चांगल्या पद्धतीने लोकांशी संपर्क वाढवून कोणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या बोलण्याच्या व लोकांची कामे करण्याच्या चांगल्या शैलीवर सुळे यांनी तालुक्यात त्यांना विजयासाठी अनुकूल होईल अशा पद्धतीने वातावरण निर्मिती केली
त्यानंतर विविध कार्यकर्त्यांना संघटनेतील पदाचे वाटप करून या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय केले त्यानंतर इंदापूर येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नुकताच शेतकरी मेळावा आयोजित केला या मेळाव्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी व जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला
यानंतर खासदार सुळे यांनी तालुक्यात आपला संपर्क कायम ठेवला महत्त्वाची गावे व इंदापूर शहरात विविध कार्यक्रम राबवून वातावरण निर्मिती केली आहे त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्याचे आमदार अजित पवार गटात सहभागी झाले असले तरी जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर इंदापूर तालुक्यात चांगली वातावरण निर्मिती केली आहे.
तसेच गावोगावी पक्षाचे चिन्ह पोहोचवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. आजही तालुक्यातील गावागावात त्यांच्या तुतारी चिन्हाच्या दिवसातून एकदा तरी लहान गावात व दिवसातून तीन ते चार वेळा मोठ्या गावात प्रचाराच्या गाड्या त्यांच्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करीत फिरत आहेत.
याशिवाय मतदानापूर्वी वेब पोर्टल व विविध चैनल च्या माध्यमातून घेतलेल्या विविध मतदारांच्या प्रतिक्रियांमधूनही सुप्रिया सुळे यांना मतदान देण्याबाबतच्या सर्वाधिक प्रतिक्रिया मिळत आहेत व त्या प्रतिक्रियांचा प्रतिसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपुढे दिसून येत आहे.
आठ एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात भिगवण येथे तर त्यांनी दुचाकी वर जाऊन महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर तालुक्यात झालेल्या विविध कार्यक्रमांना तसेच शेळगाव येथे झालेल्या सभेलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच युवा नेते युगेंद्र पवार यांच्याही तालुक्यातील दौऱ्यात त्यांच्यातील नेतृत्वगुणांमुळे व संभाषण कौशल्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे त्यामुळे युवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे याचाही फायदा खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी होत आहे
तालुक्यातील कोणताही मोठा राजकीय नेता सोबत नसताना खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेली वातावरण निर्मिती ही खरोखरच कौतुकास्पद आहे याशिवाय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विषयी तालुक्यात सहानुभूतीचे वातावरण सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या मध्ये निर्माण झाले आहे त्याचाही फायदा त्याचाही फायदा सौ सुळे यांना होणार आहे.
अर्थात प्रत्यक्ष मतदानाला अजून जवळपास एक महिन्याचा कालावधी उरला आहे त्यामुळे हे वातावरण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व सुप्रिया सुळे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
मात्र या वातावरण निर्मितीचे मतात किती रूपांतर होते हे पाहण्यासाठी येत्या सात मे पर्यंत सर्वांना वाट पहावी लागणार आहे.