पुणे ता.3 : आषाढी वारी निमित्त आलेल्या सर्व वारकरी व भक्तांसाठी इंद्रायणी नदी व देहू नगरी ची स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम “इंद्रामाई ” ग्रुप ने हाती घेतला.या वारी मधे “इंद्रामाई” गृप ने तुकोबांच्या पालखी सोहळ्यामधे स्वच्छता व जनजागृती साठी पथनाट्य सादर केले
तसेच स्वच्छता व आपली जबाबदारी यावर विविध आशयाचे फलक बनवून दिंडी सोहळ्यात प्रदर्शित केले.सर्व दिंडी देहू नगरीतून मार्गस्थ झाल्यानंतर “इंद्रामाई”गृप ने देहू नगरी,गाथा मंदिर घाट,व तुकोबा मंदीर घाट परिसर तसेच इंद्रायणी नदी परिसर व रस्ते आदी ठिकाणची स्वच्छता केली.
यावेळी “इन्द्रामाई ” गृप चे प्रतीक्षा व अमर काटकर,देवेंद्र राऊत,सागर पानसरे,मितेश भदने,गजानन आव्हाळे,तृप्ती जाधव,ज्ञानेश्वरी म्हसे,अभिषेक शिंगारे,सागर सोनवणे,प्रतिक गायकवाड,प्रज्ञा खेसे व टिम चे सदस्य यांनी सहभाग नोंदविला.