इंदापूर ता. 14 : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद वायसेवाडी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून पालखी .सोहळ्याचा अनुभव घेतला गळ्यात टाळ, वीणा, तबला तसेच हखांद्यावर पताका, डोक्यावर तुळस घेऊन मुखात हरिनामाचा जयघोष करत, अभंग म्हणत गावातून दिंडी सोहळा काढला.
विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात फुगड्या खेळण्याचाही आनंद लुटला. येथील बहुतांश लोक मेंढपाळ असून पालखीमध्ये मेंढ्याचे रिंगण आकर्षण ठरले.
या शाळेचे मुख्याध्यापक महादेव पवार. अनिल शिंदे कैलास वनवे .राजेंद्र बोरावके. मारुती दराडे. रवींद्र शेलार. संतोष ननवरे तसेच गावातील भजनी मंडळ यांनी आयोजन आणि संयोजन केले.
विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार व्हावेत मूल्य संवर्धन व्हावे यासाठी शिक्षण,शिष्यवृत्ती व क्रिडा,कला क्षेत्रात तालूक्यात आघाडीवर असणारी ही शाळा नेहमीच असे अनेक उपक्रम घेत असते. वारकरी संप्रदायाबद्दल माहिती व्हावी ,वारीचा अनुभव घडावा ,आपल्या महान संस्कृतीबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते .विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची वेशभूषा करून हा सोहळा आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गावातील अनेक लोकांनी भक्तीभावाने सहभागी होवून पालखीचे स्वागत केले व विठ्ठलाचे, रूक्माईचे व संतांचे औक्षणही केले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन याची सांगता झाली.