भिगवण ता. 5 : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपानंतर शेतकऱ्यांसाठी 3 एच पी ते 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचे विज बिल माफीची घोषणा शासनाने केली होती. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पहिल्या तीन महीन्याचे बिल महावितरण ला अदा केल्यानंतर महावितरणने शेतकऱ्यांना झिरो रकमेची बील वाटप करण्यास सुरुवात केले आहे .
इंदापूर तालुक्यात भिगवण शेटफळगढे गणातील महिला बचत गटाच्या कार्यक्रमानिमित्त आमदार दत्तात्रय भरणे हे भिगवण परिसरात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीचे शून्य बिलाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या विज बिल माफीचा शासनाने घेतलेला निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे शासनाने लाडकी बहीण योजनेला ज्या पद्धतीने महिलांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तीन ते साडेसात एचपी पर्यंत झिरो रकमेची बिले वाटप करण्यात आले आहे त्यामुळे राज्य शासन केवळ घोषणा करीत नाही तर त्याचे अंमलबजावणी करीत असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले
तसेच राज्य सरकार महिलांबरोबर शेतकऱ्यांनाही निधीची कमतरता पडू देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिलाच्या बाबतीत निश्चिंत राहावे असे भरणे यांनी यावेळी सांगितले
यावेळी नानासाहेब बंडगर, महेश पवार प्रमोद कुदळे यांच्यासह महावितरण चे कर्मचारी व शेतकरी आणि बचत गटाच्या महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या