इंदापूर ता. 26. : काय काय जळाल रं ? विचारल्यावर फक्त दफ्तर, वह्या पुस्तके आणि शाळेचा ड्रेस… इतकचं त्यानं उत्तर दिलं.
मौजे निरगुडे, तालुका इंदापूर , येथे गरीब पारधी समाजातील लाला लक्ष्मण काळे व सचिन लालासो काळे यांचे राहते घर हे परिपूर्ण जळाले आहे त्यामध्ये मुलांचे कपडे, शालेय साहित्य व आवश्यक वस्तू संपूर्ण परिपूर्ण जळून खाक झाल्या आहेत.
मराठी माध्यमिक शाळेच्या इयत्ता ९ वी च्या वर्गातील अरुण सचिन काळे स्वतः हाताने स्वयंपाक करून आजोबा आणि वडीलांना खाऊ घालतो. शाळा शिकण्याची जिद्द आहेच पण पुढे हलाखीचा डोंगर उभा असतानाच त्यात अजून भर म्हणून की काय त्याच अख्खं घर जळलं.
आता गेली ३ – ४ दिवसांपासून शाळेत गेला नाही. त्याला कुणी विचारलं देखील नाही. हताश होईन शेजारांच्याकडे राहतोय . या घटनेची माहिती कळताच “टीम इंद्रामाई ” च्या स्वयंसेवक घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला.
आपल्याला त्याला धीर द्यायचा आहे. त्याला त्याच छोटस जळलेलं घर आणि त्याचबरोबर खचलेल्या धीराला पुन्हा उभारी देण्यासाठी सामाजिक कार्यात सतत कार्यरत असलेल्या टीम *”इंद्रमाई”* च्या दानशूर, कृतिशील आणि जिंदादिल स्वयंसेवकांनी मुलांच्या शालेय साहित्य, गणवेश व अंथरुण व पांघरूण अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू भेट केल्या व आपली सामाजिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडलि.त्या मध्ये टीम तरुणाई चे अमर काटकर,देवेंद्र राऊत,सागर पानसरे,सागर सोनवणे,सतीश आघाव,प्रतीक्षा काटकर,गजानन,गणेश कुलकर्णी तसेच त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेऊन हे काम पार पाडले.