शेटफळगढे :रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय व ज्यूनि.कॉलेज शेटफळगढे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य अनिल वाबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्राचार्य जितेंद्र गावडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे उपस्थित होते.
यावेळी ५५ हुन अधिक उपकरणे सादर करण्यात आली. यामध्ये भूगर्भचेतावणी यंत्र, पवनचक्की, बोअर मशीन ,तुषार सिंचन, मायक्रोस्कोप चांद्रयान, इकोफ्रेंडली सोलर, केंद्र रेडिओ स्थान ,स्प्रे पंप , ज्वालामुखी उद्रेक आदि उपकरणे लक्षवेधक ठरली.
या प्रदर्शनात इयत्ता सातवी मध्ये शिकणारी मूकबधिर विद्यार्थिनी श्रेया धुमाळ हिने पृथ्वी वाचवण्याचा संदेश देणारी चित्र कृती तयार केली,त्या प्रकल्पाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विज्ञान खेळणी देखील यावेळी मांडण्यात आल्याने हे प्रदर्शन अधिक रंजक ठरले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे,स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, प्राचार्य जितेंद्र गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान विभागप्रमुख विद्या जगताप व अश्विनी भगत यांनी केले तसेच सर्व विज्ञान शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.