• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक *अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

*24 डिसेंबर 2024, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त—- जनजागृती पर लेख—–आता कमी पेट्रोल डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होऊ शकतो….*

तुषार झेंडे पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य

*24 डिसेंबर 2024, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त—  जनजागृती पर लेख—-आता कमी पेट्रोल डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होऊ शकतो….*

*24 डिसेंबर 2024, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती पर लेख*

आता कमी पेट्रोल डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होऊ शकतो….

तुषार झेंडे पाटील
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य
—————————–

पेट्रोल पंपावरील फसवणूक, पंप ऑपरेटर हातचलाखी, कमी पेट्रोल सोडणे, भेसळ करणे आता पंप चालकांसाठी तोट्याचा सौदा होऊ शकते…

पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.. परंतु २० जुलै, २०२० पासून देशामध्ये नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला आहे, यानुसार भेसळयुक्त किंवा बनावट उत्पादनाच्या निर्मितीसाठी किंवा विक्रीसाठी कठोर नियम निश्चित केले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ कलम ८५ उत्पादन सेवा पुरवठादाराचे दायित्व आणि कलम ८६ उत्पादित वस्तू विक्रेत्याचे दायित्व अन्वये ग्राहकाने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण / ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे तक्रार दाखल केल्यास तक्रारीमध्ये तथ्य आढल्यास पंपाचा परवाना दोन वर्षापर्यंत निलंबित केला जाऊ शकतो, यानंतरही पेट्रोल पाम्पाविरुद्ध तक्रार आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो. या नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामुळे वजन माप आणि पुरवठा विभागाची मिलीभगत चालणार नाही.

या नवीन कायद्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अस्तित्वात आले असून याचे माध्यमातून केंद्रीय प्राधिकरणाचे मुख्य आयुक्त व इतर आयुक्त / प्रादेशिक आयुक्त, शासन नियुक्त करेल, यांचे माध्यमातून एक केंद्रीय अन्वेषण विभाग निर्माण होईल त्याचे प्रमुख महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, संचालक, उपसंचालक पद निर्माण होतील. हे प्राधिकरण भ्रामक फसव्या जाहिराती विरुद्ध व अनुचित व्यापर व्यवहार विरुद्ध १० ते ५० लाखा पर्यंत दंड करेल.
श्रीमती निधी खरे या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त असून त्यांचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ccom-ccpa@nic.in या ईमेल वरती तक्रार दाखल करता येईल.

उत्पादन दायित्व , नवीन कायद्यात उत्पादक, निर्माता, विक्रेता, सेवा देणारा यांचे कायदेशीर दायित्व व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, सर्वस्वी वस्तू व सेवा मधील त्रुटीसाठी उत्पादक विक्रेता जाहिरातदार यांना जबाबदार धरले आहे.

अपराध आणि शिक्षा –
केंद्रीय प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास ६ महिने कारावास व २० लाख दंड किंवा दोन्ही होऊ शकेल.

उत्पादक किंवा विक्रेता यांनी खोट्या जाहिराती केल्याचे सिद्ध झाल्यास २ वर्षे कारावास व १० लाख दंड किंवा दोन्ही , पुन्हा तीच जाहिरात केल्यास ५ वर्षे कारावास व ५० लाख दंड किंवा दोन्ही होऊ शकेल.
एखाद्या ग्राहकाला शारीरिक इजा झाल्यास १ वर्ष कारावास व ३ लाख दंड,
जास्त इजा झाल्यास ७ वर्षे शिक्षा व ५ लाख दंड आणि अजामीनपात्र,
ग्राहकाचा मृत्यू झाल्यास आजन्म कारावास आणि १० लाख दंड आणि अजामीनपात्र
अशी शिक्षेची व दंडाची तरदूत केली आहे, कायद्यातील या तरतुदीमुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना अनुचित व्यापार व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना आळा बसेल.

भारतातील अतिप्राचीन कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात “ ग्राहक एव राजा ” हि मांडलेली संकल्पना या कायद्याच्या माध्यमातून अस्त्वित्वात येणार आहे.

१९१५ राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या माध्यमातून ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारीचे निवारण केले जाते, या टोल-फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर तत्काळ तक्रार नोंदवून ग्राहकाला टोकन क्रमांक दिला जातो आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून तक्रारीचा पाठपुरावा करून तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा पुढील कार्यवाहीसाठी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याचा सल्ला / मार्गदर्शन केले जाते. सदर प्रक्रिया ८८००००१९५ या whatsapp क्रमांकावर उपलब्ध आहे.
फक्त ग्राहकांनी संपर्क करणे आवश्यक आहे…

• जुलै मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दर्जेदार मानांकनाची पूर्तता न करणाऱ्या प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल ई – कॉमर्स कंपनी अमेझोनला एक लाख रुपये दंड व विक्री केलेले सहा कोटी पंधरा लाख रुपयांचे प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांना पैसे परत करण्याचे आदेश दिले…
• ग्राहकाला कॅरी बॅगचे शुल्क आकारले मॉलला १५०००/- दंड झाला

• मुलीला नामवंत कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतला पण मुलगी नापास झाली क्लासची फी
१५००००/- व नुकसान भरपाईपोटी १०००००/- व तक्रारीचा खर्च १००००/- असे २६००००/-
देण्याचे आदेश दिले.

• पंचतारंकित हॉटेलमध्ये महिलेचे चुकीच्या पद्धतीने केस कापले, त्यासाठी ग्राहक आयोगाने २ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
घरबसल्या न्याय मिळवा फक्त आपला एक फोन 1915, Whatsaap 8800001915 किंवा अधिक माहितीसाठी 9545594959
अॅड. तुषार झेंडे पाटील
सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मो. ९५४५५९४९५९

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025
खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर  : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

July 20, 2025
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश  : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

June 13, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

June 3, 2025
ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

June 1, 2025
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

May 27, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा–अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे*

*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा--अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group