भवानीनगर ता. 3 : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी अवघ्या एका तासात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप माजी संचालक मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी छत्रपती बचाव पॅनलची उभारणी केली. यास कार्यक्षेत्रातील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दोन मे हा अंतिम दिवस होता. या दिवशी कारखाना बिनविरोध होईल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र शेतकरी सभासदांच्या आग्रहातर व कारखान्याच्या हितासाठी या त्रिमूर्तींनी अवघ्या एका तासात पॅनलची बांधणी केली. व विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
घोलप निंबाळकर व थोरात यांनी आपल्या संचालक मंडळाच्या व अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याचा कारखान्याला प्रगतीपथावर नेण्यास उपयोग झाला. कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात छत्रपतीच्या सभासदांना सर्वाधिक ऊस दर मिळाला होता. त्यामुळे या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अनेक अदृश्य सभासदांचा व मोठ्या नेत्यांचाही अप्रत्यक्षपणे पाठिंबा या पॅनलला मिळणार आहे
अवघ्या एका तासात पॅनलची जुळणी करेपर्यंत अनेकांनी समोरून पॅनल होणार नाही अशा अपेक्षेने आपली उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यामुळे छत्रपती बचाव पॅनलला 21 जागांपैकी 16 जागेवर उमेदवार मिळाले आहेत.
ही जर घोषणा सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत झाली असती तर सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असते. परंतु उमेदवारांची संख्या जरी कमी असली तरी या पॅनलच्या विजयाची मात्र हमी आहे. अशी खात्री शेतकरी सभासद देत आहेत.