भिगवण, ता. २७
इंदापुर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील शेटफळगढे, निरगुडे, भिगवण, मदनवाडी आदीसह अनेक गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीमुळे लोकांचे संसार उघडयावर आले आहेत. नुकसानग्रस्त भागातील लोकांना आवश्यक ती तातडीची मदत तत्काळ करण्यात यावी अशी मागणी भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते व हर्षवर्धन पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हनुमंत काजळे पाटील यांनी केली आहे.
भिगवण-शेटफळगढे परिसरांमध्ये मागील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी रविवारी(ता.२५) रोजी मोठी अतिवृष्टी झाली. यामध्ये शेटफळगढे निरगुडे, मदनवाडी,भिगवण(ता.इंदापुर) तसेच तालुक्यातील इतरही गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत ही स्वागतार्ह बाब आहे.
परंतु पंचनामे करुन नुकसानग्रस्तास शासकीय मदत मिळण्यास बराच कालावधी लागतो. ज्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यांचे संसार उघडयावर आले आहेत अशा कुटुंबाना धान्य, औषधे, निवारा सारख्या अत्यावश्यक बाबीचा तातडीने पुरविण्याची आवश्यकता आहे.
याबाबत हनुमंत काजळे-पाटील म्हणाले, शेटफळगढे, निरगुडे तसेच भिगवण मदनवाडी सारख्या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचा निवारा हिरावला गेला आहेत तर घरातील सर्व वस्तु पाण्यामध्ये वाहुन गेल्यामुळे त्यांना भांडी, अन्न धान्य आदींची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पंचनामे करुन शासकीय मदत मिळेल परंतु सध्या रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाना शासनाच्या माध्यमातून तातडीने आधार देण्याची आवश्यकता आहे.
याबाबत राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातुन पुणे जिल्हाधिकारी, बारामती उपविभागीय प्रांताधिकारी तसेच इंदापुरचे तहसिलदार यांचेकडे आग्रही मागणी करणार आहे.